Home महाराष्ट्र राजीनाम्याचे कारण अखेर स्पष्ट, अजित पवारांनी स्वतःच केला खुलासा

राजीनाम्याचे कारण अखेर स्पष्ट, अजित पवारांनी स्वतःच केला खुलासा

0

अचानकपणे आमदार पदाचा राजीनामा दिलेल्या अजित पवारांनी शेवटी राजीनाम्याचे कारण स्पष्ट केले आहे. आज दुपारी पत्रकार परिषदेत बोलतांना त्यांनी यावर भाष्य केले. ‘कुटुंबातील वादविवादामुळे राजीनामा दिला’ ही एक अफवा होती असेही त्यांनी स्पष्ट केले.

शरद पवारांनी त्यांच्या मुंबईतील घरी अजित पवारांची भेट घेतली. त्यावेळी तिथे सुप्रिया सुळे तसेच इतर पवार कुटुंबीय उपस्थित होते. पत्रकार परिषदेत बोलतांना अजित पवारांनी सांगितले की, “महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्यात काहीही हात नसतांना शरद पवारांचे नाव आले. मी बँकेच्या संचालक मंडळावर असल्यामुळे पवारसाहेबांना माझ्यामुळे त्रास झाला. यामुळेच अस्वस्थ होऊन मी राजीनामा दिला.” हे बोलतांना त्यांना गहिवरून आले होते. तसेच अचानक राजीनामा दिल्याने सगळीकडे गोंधळ उडाला त्यामुळे त्यांनी सर्वांची माफी मागितली. तसेच “आम्ही एकत्र कुटुंबात राहत असून सर्वजण चर्चा करून निर्णय घेतो. त्यामुळे कुटुंबात कसलाही कलह नसून त्या सर्व अफवा होत्या” असेही त्यांनी स्पष्ट केले. अजित पवारांनी राजीनाम्याबद्दल स्वतःच स्पष्टीकरण दिल्याने सद्ध्यातरी अफवांना आळा बसला आहे.