Home महाराष्ट्र पुणे राजीनाम्यानंतर अजित पवार ‘नॉट रीचेबल’: आज शरद पवार जाणार त्यांच्या भेटीला

राजीनाम्यानंतर अजित पवार ‘नॉट रीचेबल’: आज शरद पवार जाणार त्यांच्या भेटीला

0

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आमदार पदाचा राजीनामा दिल्याचे आपण काल ऐकले. त्यानंतर बराच वेळ त्यांचा फोन बंद होता असेही समजले. राजीनाम्यानंतर शुक्रवारी रात्री ते कर्जत येथील अंबालिका साखर कारखान्यावर थांबले व सकाळी तिथून निघून गेले असे मीडिया न्यूजनुसार समजले. आता ते नेमके कुठे आहेत हे कळू शकले नाही. ते कारखान्यावर गेले आहेत याची अगोदर कोणालाही कल्पना नव्हती. मात्र याबद्दल बाहेर कळल्यावर ते तेथून कुठेतरी दुसरीकडे गेले. कारखान्यावर असतांना त्यांनी कोणाशीच संवाद साधला नाही असे समजले. तरी ते सध्या मुंबईतच असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शरद पवारांचाही अद्याप अजित पवारांशी संपर्क होऊ शकलेला नाही. त्यामुळे ते अजित पवारांना भेटायला आज पुण्याहून मुंबईला जाणार आहेत. राष्ट्रवादीच्या बऱ्याच नेत्यांचा भाजप प्रवेश, पक्षाध्यक्ष शरद पवारांवर ईडीचा गुन्हा दाखल आणि आता अजित पवारांचा आमदारकीचा राजीनामा या सर्व घटनांमुळे राष्ट्रवादी पक्षात खळबळ उडाली असून त्यामुळे इतर राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे.