
प्राईम नेटवर्क : शनिवारी महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळं वळण देणारी घटना घडली होती. घर का भेदी बनत चक्क अजित पवारांनी राष्ट्रवादीलाच सुरुंग लावण्याचं काम केलं होतं. शनिवारी पहाटे उपमुख्य मंत्रिपदाची शपथ घेतल्या नंतर अजित पवार यांनी एक दिवस आधी रात्री राज्यपालांना दिलेल्या पत्रात नेमके काय होतं, हा प्रश्न अनेकांना पडला होता, आता याचा नेमका उलगडा सुप्रीम कोर्टात झाला आहे.
अजित पवार यांनी राज्यपालांकडे दिलेल्या पत्रात राष्ट्रवादीच्या संपूर्ण ५४ आमदारांची नावे आणि सह्या असल्याचं समोर आलं आहे. या पत्रात सर्व ५४ आमदारांची स्वाक्षरी होती. राज्यात अधिक वेळ राष्ट्रपती राजवट असू नये असं मला वाटतं. म्हणून मी सत्ता स्थापनेच्या दृष्टीने भाजपाला पाठिंबा देत आहे. मी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचा गटनेता आहे आणि माझ्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे एकूण ५४ आमदार आहेत.

आज झालेल्या सुप्रीम कोर्टातील सुनावणी वेळी अजित पवारांचं हे पत्र सुप्रीम कोर्टात सादर केलं गेलं, यावेळी या मराठी पत्राचा अनुवाद तुषार मेहता यांनी करत सुप्रीम कोर्टाला माहिती दिली.
या बद्दल शरद पवारांनी पत्रकार परिषदेत या प्रकारा बद्दल शंका व्यक्त केली होती, यावेळी शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांची सही असलेली यादी अजित पवारांनी राज्यपालांना दिली असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. यामुळे राज्यपाल यांची देखील फसवणूक झाली असण्याची शक्यता शरद पवार यांनी व्यक्त केली होती.
दरम्यान (शनिवारी) राज्याच्या राजकारणाला मोठी कलाटणी देणारी घटना घडली. देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आज राजभवनात हा शपथविधी पार पडला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना शपथ दिली.
अजित पवारांच्या बंडखोरीमुळे पवार कुटुंबियांच्या उभी फूट पडल्याचं दिसत आहे. अजित पवारांच्या या अचानक वागण्यामुळे पवार कुटुंबीय उद्विग्न झाल्याचं पाहायला मिळालं, रोहित पवार यांनी आपल्या फेसबुक प्रोफिलचा दोनदा फोटो बदलला, त्यांनी आजोबा शरद पवार यांच्या सोबत असलेला फोटो फेसबुक वर टाकत आपण शरद पवार यांच्या बरोबरच असल्याचा दाखवून दिल, तर सुप्रिया सुळे यांनी आपल्या व्हाट्सअपचं स्टेटस अनेक वेळा बदललं, त्यांनी आपल्या व्हाट्सअप वर कालपासून अनेक स्टेट्स बदलल्याचं पाहायला मिळाल..
हे सुद्धा वाचा :
मी अजून हि राष्ट्रवादी मध्येच आणि साहेबच माझे नेते, फक्त थोडा धीर धरा : अजित पवार
आमच्यासाठी अजित पवार आता कुटुंबाचा हिस्सा नाही, सुप्रिया सुळेंच व्हाट्सअप स्टेटस