Home महाराष्ट्र “अजितदादा तुम्हीच मुख्यमंत्री!” : चंद्रकांत पाटील

“अजितदादा तुम्हीच मुख्यमंत्री!” : चंद्रकांत पाटील

0

“अजितदादा सध्या तुम्हीच मुख्यमंत्री आहात!” अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टोला लगावत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सुद्धा निशाणा साधला आहे. पुणे महापालिकेतर्फे आयोजित एका कार्यक्रमात ते हजर होते. या कार्यक्रमाला अजित पवार यांची सुद्धा प्रमुख उपस्थिती होती.

महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत. मात्र, उपमुख्यमंत्री असलेल्या अजितदादा पवार यांनी गेल्या काही दिवसांंमध्ये खूप धडाडीने निर्णय घेतले आहेत. यावरूनच अजितदादांना निर्णय घ्यायला काहीच वेळ नाही. ते धडाडीचे राजकीय नेतृत्व म्हणून ओळखले जात आहेत. बघायला गेलं तुम्हीच मुख्यमंत्री आहात, अशा खोचक शब्दांत सोमवारी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी अजित पवारांवर टोला लगावला.

पुणे महानगरपालिकेच्या वतीनं सरसंघचालक बाळासाहेब देवरस एव्हिएशन गॅलरीचे उदघाटन प्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि  चंद्रकांत पाटील एकाच मंचावर उपस्तिथ होते.