Home महाराष्ट्र अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या राष्ट्रीय सचिवाचा नदीत बुडून मृत्यू

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या राष्ट्रीय सचिवाचा नदीत बुडून मृत्यू

0

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे अर्थात अभाविपचे राष्ट्रीय सचिव अनिकेत ओव्हाळ यांचा आज ११ ऑक्टोबरला मृत्यू झाल्याचे मीडिया न्यूजवरून समजले. नंदुरबाड येथे नदीत बुडून त्यांचा मृत्यू झाला. अभाविपचे माजी राष्ट्रे अध्यक्ष मिलिंद मराठे यांनी ही माहिती दिली.

लोकसत्ताच्या मीडिया न्यूजनुसार मिलिंद मराठे यांनी सांगितले की अनिकेत ओव्हाळ हे काही लोकांसह धाडगाव येथील नदीत पोहायला गेले होते. पोहत असतांनाच ते नदीतील एका भोवऱ्यात अडकले व त्यातून बाहेर पडणे त्यांना शक्यच झाले नाही. त्यांच्या मृत्यूमुळे अभाविपच्या राष्ट्रीय सचिवाची जागा आता रिक्त झाली आहे.

गेल्या दोन वर्षांपूर्वी अनिकेत यांची राष्ट्रीय सचिव म्हणून निवड झाली होती. त्याआधी ते महाराष्ट्र सचिव म्हणून काम पाहत होते.