
महाराष्ट्रामध्ये कोरोनाने पहिला बळी घेतला असून कस्तुरबा रुग्णालयात कोरोनाच्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. हिंदुजा रुग्णालयामधून या रुग्णाला कस्तुरबा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं, पण आज या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. ६४ वर्षाच्या या रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशभरात आतापर्यंत ३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून कर्नाटक, दिल्लीनंतर मुंबईत कोरोनाचा तिसरा बळी गेला आहे.
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ‘करोना’च्या पार्श्वभूमीवर उद्योजकांसोबत मुंबई येथे बैठक घेतली.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य खात्याने अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत.या पार्श्वभूमीवर खासगी कंपन्यांचेही सहकाऱ्यासाठी तातडीच्या बैठकीचे आयोजन केले होते.या बैठकीला १८ खासगी कंपन्यांच्या प्रतिनिधी उपस्थित होते. कोरोना चा प्रभाव ३ऱ्या पातळीपर्यंत पोहचू नये म्हणून कॉर्पोरेट क्षेत्र सुद्धा आग्रही म्हणूनच १००% कॉर्पोरेट कंपन्या सुद्धा बंद करणार.
तसेच मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकलमध्ये दररोज एकाच डब्यात शेकडो प्रवासी एकत्रित प्रवास करत असतात. त्यामुळे रेल्वे यंत्रणेने सतर्क राहण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी दिले होते . दरम्यान, कोरोनाचा संसर्ग वाढल्यास प्रसंगी मुंबईची लोकल सेवा ठप्प पडण्याची भीतीही रेल्वेतील एका अधिकार्याने खासगीत बोलताना व्यक्त केली पण आता मुख्यमंत्री लवकरच एक बैठक घेऊन लोकल संबंधित निर्णय जाहीर करणार असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले