Home आरोग्य “अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने दिवसरात्र सुरू राहणार” :मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

“अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने दिवसरात्र सुरू राहणार” :मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जीवनावश्यक वस्तुंची दुकाने २४ तास सुरू ठेवण्याचा आदेश काल म्हणजेच गुरुवारी दिला. या दुकानांना स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण सोबतच सामाजिक अंतर राखणाच्या अतिशर्ती सुद्धा घालून देण्यात आल्या आहेत.

“राज्यातील सर्व अत्यावश्यक वस्तू आणि सुविधा पुरवणाऱ्या दुकानांना २४ तास सुरू राहण्याची परवानगी मुख्यमंत्र्यांनी दिली आहे तर अशा दुकानांनी स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण सोबतच सामाजिक अंतर राखण्याची अट बांधील असेल” असे उद्धव ठाकरेंच्या कार्यालयीन जाहीरनाम्यात म्हटले आहे. या नंतर गृहनिर्माण संस्थांना ताकीद सुद्धा देण्यात आली, डॉक्टर आणि नर्सेस यांच्या परिवारांना नाहक त्रास देणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल असे उद्धव ठाकरे म्हणाले.

“कोविड आजाराच्या भीतीने गृह निर्माण संस्था आपल्या इमारती मधील डॉक्टर आणि त्यांच्या परिवाराला घर सोडण्याची ताकीद देत आहेत अशा अनेक तक्रारी आम्हाला मिळाल्या आहेत, अशा संस्थांना मोठा दंड करण्यात येईल” असे मुख्यमंत्री म्हणाले तर राज्यातील ट्रक ड्रायव्हर आणि माल वाहतूक यांना कुठलीही तकलीफ होणार नाही असे आश्वासन अजित पवार यांनी दिले. “मालवाहतूक करणाऱ्या ट्रक्स ना माल पोहोचता केल्यानंतर सुद्धा ड्रायव्हर वर कुठलीच सक्ती होणार नाही याची शाश्वती आम्ही देतो” असे अजित पवार म्हणाले. तसेच गरिबांसाठी कम्युनिटी किचन ला सुद्धा मंजुरी देण्यात आली आहे.