
सध्या राज्यातील प्रत्येक नागरिकाचं मन वेधलं आहे ते आगामी विधानसभा निवडणुकांनी. त्यातल्या त्यात महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रश्न म्हणजे भाजप-सेना युती होणार की नाही… मात्र नुकत्याच आलेल्या मीडिया रिपोर्टनुसार ‘शिवसेनेला १४४ जागा दिल्या नाहीत तर, युती तुटू शकते’, असं शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे मंत्री दिवाकर रावते यांनी वक्तव्य केले आहे . त्यांच्या या वक्तव्याचं बरेच शिवसैनिक समर्थन करीत आहेत. शिवसेना नेत्यांच्या या वक्तव्यामुळे जागावाटपातील अडचणी आणखी वाढल्या आहेत.
शिवसेनेचे नेते दिवाकर रावते यांनी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी १४४ जागांची मागणी केली. या वेळी ते म्हणाले, ‘शिवसेनेला विधानसभेत १४४ जागा मिळाल्या नाहीत तर युती राहणार नाही.’ त्यांच्या या विधानाचं समर्थन करत खासदार संजय राऊत म्हणाले की भाजपने जागावाटपासाठी ५०-५० च्या फॉर्मुल्याचा सन्मान करावा. परंतु भाजप अजूनही १२० पेक्षा जास्त जागा शिवसेनेला द्यायला तयार नसल्याने आता सर्वांचं लक्ष याकडे आहे की पुढे काय होणार.