Home महाराष्ट्र अमित राज ठाकरेंची राजकीय आखाड्यात जोरदार इन्ट्री!

अमित राज ठाकरेंची राजकीय आखाड्यात जोरदार इन्ट्री!

0

राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे यांची मनसेच्या महाअधिवेशना दरम्यान पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली अशी माहिती मिळत आहे. लोकमतच्या एक रिपोर्ट नुसार बाळा नांदगावकरांनी हा प्रस्ताव मांडला व त्याला इतरांनी देखील आनंदात अनुमोदन दिलं. महाअधिवेशना दरम्यान पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आल्या नंतर अमित ठाकरेंनी मंचावर येऊन आपल्या भावना व्यक्त केल्या. वडील राज ठाकरे यांचे आभार मनात अमित यांनी भाषणाला सुरवात केली.

मंचावर बोलताना अमित ठाकरे म्हणाले “मला काल संध्याकाळी राज ठाकरे साहेबांनी महाअधिवेशना दरम्यान ठराव मांडणार असल्याचं सांगितलं व क्षणभर माझ्या पायाखालची जमीन सरकली. येत्या दोन महिन्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला १४ वर्ष पूर्ण होतील. या १४ वर्षांतलं हे माझं पहिलं अधिवेशन असून, मी पहिल्यांदाच व्यासपीठावर उभा राहून मायबाप जनतेशी बोलतो आहे. त्यामुळे आजचा दिवस हा माझ्या आयुष्याचा खूप मोठा दिवस आहे” असं म्हणत अमित ठाकरेंनी महाअधिवेशन गाजवलं तर उपस्थित जनसमुदयाने देखील त्यांना उत्तम प्रतिसाद दिला.