Home इतिहास महापुरुषांच्या यादीत संभाजी महाराजांचे नाव नाही! डॉ. अमोल कोल्हे भडकले

महापुरुषांच्या यादीत संभाजी महाराजांचे नाव नाही! डॉ. अमोल कोल्हे भडकले

0

महाराष्ट्र राज्य सरकारने महापुरुषांची दिनविशेष यादी बनवली आहे. या यादीमध्ये संभाजी महाराजांचे नाव नसल्यामुळे, राष्ट्रवादी काँग्रेस चे डॉ अमोल कोल्हे हे नाराज झाले असून , सरकारने तात्काळ या यादीत संभाजी महाराजांचे नाव समाविष्ट करावे असे सांगितले.

‘महाराष्ट्राच्या ज्वलंत इतिहासात छत्रपती संभाजी महाराजांचं योगदान न विसरण्याजोगं आहे. शासनाने थोर महापुरुषांची दिनविशेष यादी बनवली आहे. त्यात छत्रपती संभाजी राजेंच्या नावाचा उल्लेख नाही. विनंती आहे की त्वरित या बाबतीत लक्ष घालून शासनाने सुधारणा करावी’ असं ट्वीट अमोल कोल्हे यांनी काल रात्री केलं आहे.

डॉ अमोल कोल्हे यांनी टेलिव्हिजन स्क्रीन वर शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या अतिशय लोकप्रिय भूमिका केलेल्या आहेत. राज्य सरकारने ही यादी जाहीर केल्यानंतर संभाजी महाराजांचे नाव नसल्यामुळे कोल्हे हे नाराज झाले हे स्पष्ट आहे.

फडणवीस सरकारच्या काळात सुद्धा ह्या यादीमध्ये वीर सावरकर यांचे नाव राहिले होते, एकीकडे सावरकरांना भारतरत्न मागायचा आणि त्यानाच विसरायचं असा प्रश्न तेव्हा विचारण्यात आला होता.