
‘मी सावरकर नाही, गांधी आहे’ या राहुल गांधींच्या वक्तव्यावरून राज्यभरात अनेक ठिकाणी विविध पक्षांनी निरनिराळ्या माध्यमांद्वारे विरोध व्यक्त केला. दरम्याम १४ डिसेंबर रोजी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गाधींवर टीका करत ‘केवळ गांधी आडनाव चालत नाही तर तशी कामगिरी देखील असावी लागते’ अशी ट्विट पोस्ट केली होती. याच ट्विटला काल अर्थात २२ डिसेंबर रोजी फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी रिट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
अमृता व देवेंद्र फडविस याचं ट्विट खालील प्रमाणे…
अमृता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीसांचं ट्विट रिट्विट करत सरळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली. ज्या प्रमाणे देवेंद्र फडणवीसांनी राहुल गाधींवर टीका केली होती त्याचीच नक्कल करत अमृता फडणवीस म्हणाल्या “अगदी खरं आहे, केवळ आडनाव ठाकरे असून कुणी ठाकरे होत नाही; त्यासाठी सत्ता व कुटुंब पलीकडे जनसेवाही करावी लागते” अमृता यांच्या या ट्विटवरून वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर दुसरीकडे अमृता फडणवीस ट्रोल होऊ लागल्या आहेत अशी माहिती लोकमतच्या एका वृत्ततातुन मिळत आहे.