
औरंगाबादमधील महात्मा गांधी मिशन अर्थात एमजीएम विद्यापीठाला लागून प्रियदर्शनी उद्यान आहे जिथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक होणार असल्याची माहिती मिळत आहे. सुमारे १७ एकर जागेवर हे स्मारक होणार असून त्यासाठी ६४ कोटींची मागणी करण्यात आली होती त्यापैकी शासनाकडून ५ कोटी रूपये मिळाले आहेत.
औरंगाबादमध्ये होणार्याच्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी प्रियदर्शनी उद्यानातील एक हजार झाडं तोडणार असल्याची माहीत नुकताच प्रसार माध्यमांनी दिली. परिणामी या प्रकारावर जोरदार चर्चा चालू झाली आहे. कारशेडसाठी झाडे तोडत असताना आदित्य ठाकरेंनी पुढाकार घेऊन वृक्षतोड थांबावी यासाठी शिवसेनेने प्रयत्न केले होते मग आता शिवसेनाच 1000 झाडे तोडणार यावर जनतेने खंत व्यक्त केली तर अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून संताप व्यक्त केला.
नेटकार्याच्या संताप आणि टिकांमध्ये मध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील हात धून घेतले आहेत. त्यांनी देखील ‘वृक्षतोड’ याचं मुद्यावर शिवसेनेवर टीका केली. त्या म्हणाल्या “ढोंगीपणा हा एक आजार आहे, या आजारातून शिवसेनेने लवकर लवकर बरं व्हावं” अशी टीका केली.
त्यांनी केलेली ट्विट पुढील प्रमाणे…
त्याच्या या ट्विट वरून असं लक्षात येत आहे की अमृता आता विरोधी पक्ष नेत्याच्या पत्नी म्हणून सज्ज झाल्यासून त्यांनी आता टीकाशस्त्राने वार करायला सुरुवात केली आहे मात्र यावर शिवसेना देखील गप्प नाही. अमृता फडणवीस यांच्या ट्विटला प्रियांका चतुर्वेदी यांनी आगदी सणसणीत उत्तर दिलं आहे. त्यांचं ट्विट पुढील प्रमाणे
प्रियांका चतुर्वेदी यांनी अमृता फडणवीस यांच्या ट्विटला उत्तर देत तुम्ही लवकरच बऱ्या व्हाल असं उत्तर दिलं आहे.