Home महाराष्ट्र आणि स्वतः पवारांनी “त्या” सुरक्षारक्षकाला बोलावून त्याच्या सोबत फोटो काढला: शरद पवारांच्या...

आणि स्वतः पवारांनी “त्या” सुरक्षारक्षकाला बोलावून त्याच्या सोबत फोटो काढला: शरद पवारांच्या भावनिक कृतीचं सगळीकडे कौतुक

0

राष्ट्रपती राजवट लागू झाल्यामुळे आज जरा राजकीय घडामोडींची गती थंडावली आहे. अन्यथा कालपर्यंत सर्वत्र भाजप-शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हेच नावं ऐकायला येत होते. त्यात शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्व शरद पवार यांच्यावर सर्वांची विशेष नजर होती. आज नुकताच हा प्रकार जरा शांत होतो न होतो की एका घटनेने पुन्हा एकदा शरद पवारांच्या नावाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू झाली आहे.

शरद पवार यांनी आज विधानभवनात भेट देऊन वसंत दादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केलं. दरम्यान फोटोग्राफर लोकांनी आमदारांसह ग्रुप फोटो काढण्यासाठी शरद पवारांना विनंती केली. पवारांनी ग्रुप फोटोला परवानगी दिल्यानंतर सर्व फोटोसाठी उभे असतांना पवारांचं लक्ष अचानक कोपऱ्यात उभ्या असणाऱ्या विधानभवनाच्या सुरक्षारक्षकाकडे गेलं. त्यावेळी स्वतः पवारांनी त्या सुरक्षारक्षकाला बोलवून पहिल्या रांगेत उभे करुन ग्रुप मध्ये सहभागी केलं व स्वतःसोबत फोटो काढला. पवारांच्या या भावनिक कृतीने अनेकांचे लक्ष या घटनेकडे वेधले आहे व सगळीकडे त्यांचं कौतुक केलं जातं आहे. सध्या या फोटोची चर्चा राजकीय वर्तुळात तर होतच आहे सोबत सोशल मीडियावरही हा विषय पेटला आहे.