Home महाराष्ट्र भाजप-सेना युतीचा शिक्कामोर्तब अद्याप टांगणीला…

भाजप-सेना युतीचा शिक्कामोर्तब अद्याप टांगणीला…

0

महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना या दोन राजकीय पक्षांच्या अनेक वर्षांपासूनच्या युतीबद्दल आपल्याला ठाऊक आहेच. गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणूकीत ही युती तुटण्याच्या मार्गावर होती. परंतु निकालानंतरच्या स्थितीमुळे युती टिकून राहिली व दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र आले. यावर्षीच्या लोकसभा निवडणूकीत देखील भाजप-शिवसेना युतीने जोरदार लढा दिला. आता विधानसभा निवडणुका देखील हे पक्ष एकत्रितरित्या लढणार आहेत.

सध्या विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असतांना भाजप-शिवसेना युतीची चर्चा सगळीकडे चाललेली दिसून येत आहे. यावेळी शिवसेनेला लहान भावाची भूमिका स्वीकारावी लागणार असं बोललं जात आहे. त्याचं कारण म्हणजे निवडणुक लढण्यासाठी भाजपला १६०, शिवसेनेला १२० तर इतर लहान मित्रपक्षांना ८ जागा देण्यात येतील असा फॉर्मुला भाजपकडून देण्यात आला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी शिवसेनेचे नेते तसेच उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याशी युतीच्या निर्णयावर चर्चा केली. या चर्चेत भाजपने दिलेल्या फॉर्मुल्यावर नाखुशी दर्शवून भाजप शिवसेना दोघांनाही प्रत्येकी १४० जागा देण्यात याव्या व ८ जागा लहान मित्रपक्षांसाठी ठेवाव्या असा प्रस्ताव मांडला.