
कंगना रनौत प्रकरण आणि माजी नौदल अधिकाऱ्याला मारहाण केल्या प्रकरणी राज्यात भाजपा आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष पेटला आहे. तसेच भाजपने आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात मोर्चा उघडला आहे तसेच ठाकरे सरकारविरोधात राष्ट्रीय मानावाधिकार आयोगाकडे धाव घेतली आहे.
भाजपकडून ठाकरे सरकारवर अनेक आरोप करण्यात आले आहे त्यामध्ये राज्यात मानावाधिकारच मोठया प्रमाणात उल्लंघन होत आहे हा मुद्दा देखील आहे. खासदार विनय सहस्रबुद्धे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय मानावाधिकार आयोगाचे अध्यक्ष एच. एल. दत्तू यांच्याकडे तक्रार केली.
5या तक्रारींमध्ये भाजप खासदारांनी 8 घटनांची माहिती देऊन ठाकरे सरकारवर गंभीर आरोप करत निशाना साधला आहे. आयोगाला सांगण्यात आले की दिसेम्बर 2019 पासून राज्यात मानवाधिकार उल्लंघणाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.