
माजी मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची एक ध्वनिफीत व्हायरल झाली आहे ज्यात ते ‘महिनाभरात पक्ष सोडणार’ असे सांगत आहेत. शिवाय “दुसऱ्या पक्षात काय पद मिळते, याची प्रतीक्षा आहे” असा संवाद या क्लिप मध्ये आहे. सध्या हि क्लिप सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत असून मीडिया रिपोर्ट नुसार ‘खडसेंना पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारीणीत स्थान न दिल्यामुळे त्यांची नाराजी अधिकच वाढली आहे’ असं म्हटलं जात आहे. दरम्यान त्यांना काही कार्यकर्ते फोन करून वेळीच योग्य निर्णय घेण्याचा सल्ला देत आहेत. अशाच कलेचे हे रेकॉर्डिंग आहे.
लोकमतच्या रिपोर्ट नुसार – भुसावळ तालुक्यातील वरणगावचे कार्यकर्ते रोशन भंगाळे यानि खडसेंना कॉल करून पक्ष सोडण्याविषयी चर्चा केली. या कॉलची रेकॉर्डिंग आता सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. हा तरुण मात्र आता नॉट रिचेबल झाला असे सांगण्यात येत आहे. या क्लिपविषयी खडसे यांनी सांगितले की, “कार्यकर्ते अशा प्रकारची चौकशी करतात, तो कॉल चुकीचा असून ही बाब गांभीर्याने घेण्याची गरज नाहीये.”
या क्लिपमधील संवाद खालील प्रमाणे –
रविंद्र भंगाळे (कार्यकर्ते) – भाऊ ( खडसे ) आता राष्ट्रीय कार्यकारीणीतही डावलण्यात आल्याने पक्ष सोडा व योग्य निर्णय घ्या.
खडसे : हो निर्णय घ्यायचा आहे. दुसरीकडे काय पद मिळते, ते बघू. दुसरीकडे जाऊन का नुसतेच बसायचे, काही तरी पद मिळाले पाहिजे की नाही, महिनाभरात निर्णय घेऊ.