Home महाराष्ट्र औरंगाबाद औरंगाबाद विमानतळाचे नाव आता ‘छत्रपती संभाजी महाराज विमानतळ’

औरंगाबाद विमानतळाचे नाव आता ‘छत्रपती संभाजी महाराज विमानतळ’

0

महाराष्ट्र सरकारच्या कॅबिनेटने एक मोठ्ठा निर्णय समोर आणला आहे. यानुसार औरंगाबाद विमानतळाचे नाव बदलून छत्रपती संभाजी महाराज विमानतळ करण्यात येत आहे. 
औरंगाबाद शहराचे नाव संभाजी नगर करणार असल्याची चर्चा सुरू असतांंनाच आता ठाकरे सरकारने औरंगाबाद मधील चिखलठाणा येथे असलेल्या विमानतळाचे नाव छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असे ठेवले असे ANI या वृत्तसंस्थेने जाहीर केले. औरंगाबाद शहराला संभाजी महाराजांच्या आठवणी आणि इतिहास आहे. क्रूर औरंगजेबाच्या नावावरून औरंगाबाद असे नाव केलेल्या शहराला संभाजी नगर असे नामांतर व्हावे यासाठी अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. त्यामुळे विमानतळाच्या नावाबरोबरच शहराचे नामांतर सुद्धा होणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे. 

औरंगाबाद शहर हे राज्यातील मुख्य औद्योगिक शहर असून जिल्ह्यात असलेल्या अनेक ऐतिहासिक ठिकाणांना भेट देण्यासाठी हजारो विदेशी पर्यटक सुद्धा जिल्ह्यात येत असतात. औरंगाबाद विमानतळाचे नाव ‘छत्रपती संभाजी महाराज विमानतळ’ केल्याने संभाजी महाराजांची कीर्ती देशोदेशी पसरणार हे नक्की.