Home महाराष्ट्र “महाराष्ट्राच्या जनतेने काय करावं, हे शिकवणं अ‍ॅक्सिस बँकेच्या कर्मचाऱ्यांचं काम नाही” :...

“महाराष्ट्राच्या जनतेने काय करावं, हे शिकवणं अ‍ॅक्सिस बँकेच्या कर्मचाऱ्यांचं काम नाही” : प्रियंका यांनी अमृता यांना घेतलं फौलावर

0

काही दिवसांपूर्वी ठाणे महापालिकेने अ‍ॅक्सिस बँकेतील सर्व कर्मचाऱ्यांची खाती राष्ट्रीयकृत बँकेत वळवण्याचा निर्णय घेतला होता. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पोलीस कर्मचाऱ्यांची खाती देखील राष्ट्रीयकृत बँकेत वळवणार आहेत. अर्थात यावर माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी व अ‍ॅक्सिस बँकेच्या अधिकारी अमृता फडणवीस शांत कशा बसणार? शासनाच्या या निर्णयावर आक्षेप घेत त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. अमृता म्हणाल्या, “एक वाईट नेता मिळावा ही जनतेची चूक नाही. पण त्या नेत्याला पाठींबा देणं ही मात्र जनतेची चूक आहे.” अमृता फडणवीस यांच्या टीकेवर शिवसेनेच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी पेटून उठल्या आहेत. प्रियंका  यांनी ट्विट करून अमृता यांना चांगलंच फौलावर घेतलं.

शिवसेनेच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी, “महाराष्ट्राच्या जनतेने काय करावं हे शिकवणं अ‍ॅक्सिस बँकेच्या कर्मचाऱ्यांचं काम नाही” असं सणसणीत उत्तर दिलं आहे. त्याचबरोबर प्रियंका यांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांना कोणत्या परिस्थितीत राष्ट्रीयकृत बँकेतील खाती अ‍ॅक्सिस बँकेत वळवण्यात आली, याची चौकशी करावी अशी विनंती देखील शासनाला केली आहे. प्रियंका चतुर्वेदी यांनी ट्विट करून अमृता यांना दिलेले उत्तर पुढील प्रमाणे…