Home महाराष्ट्र बाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या!

बाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या!

0

आनंदवनचे संस्थापक व सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांची नात विकास आमटे यांची कन्या डॉक्टर शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याचे नुकतेच समजले आहे. वरोरा येथील महारोगी सेवा समितीच्या त्या सीईओ असून आनंदवनची संपूर्ण जबाबदारी सांभाळत होत्या. मीडिया न्यूजनुसार मागील काही दिवसांपासून आमटे कुटुंबात कौटुंबिक कलह सुरु होते व शीतल आमटे यादेखील या वादात सामील होत्या. तसेच त्या मानसिक तणावात असल्याचेही त्यांच्या कुटुंबियांकडून समजले होते असे लोकसत्ताच्या मीडिया न्यूजवरून समजते.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार शीतल आमटे यांनी आत्महत्या करण्यासाठी विषाचे इंजेक्शन घेतले होते. हे समजताच त्यांना वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात तातडीने नेण्यात आले. मात्र त्याआधीच त्यांनी प्राण गमावले होते. शीतल आमटेंच्या आत्महत्येमुळे आनंदवनावर शोककळा पसरली आहे. अद्याप तरी त्यांच्या आत्महत्येचे कारण कौटुंबिक कलहच असल्याचे समोर येत आहे. मात्र सत्य अजून स्पष्ट झालेले नाही.