Home महाराष्ट्र राज्यमंत्र्यांची अवस्था ग्रामपंचायत सदस्यां सारखी : बच्चू कडूंची व्यथा, ठाकरे सरकारमधला बेबनाव...

राज्यमंत्र्यांची अवस्था ग्रामपंचायत सदस्यां सारखी : बच्चू कडूंची व्यथा, ठाकरे सरकारमधला बेबनाव उघड

0

प्राईम नेटवर्क : राज्यातील महाविकास आघाडीचं मंत्रिमंडळ बनवून आता बरेच दिवस उलटले. प्रत्येक पक्षाला मनाप्रमाणे खातेवाटप जाहीर सुद्धा झालं. मात्र कॅबिनेट मंत्री आपल्याला विश्वासात घेत नसल्याची संबंधित विभागाच्या राज्यमंत्रीची तक्रार आहे. राज्य मंत्री ज्या खात्याचा आहे. त्या खात्यात होणारे निर्णय सुद्धा राज्यमंत्र्याला डावलून होत असल्याचं या निमित्ताने समोर आलं आहे. जलसंपदा, शालेय शिक्षण आणि महिला व बालविकास राज्य मंत्री बच्चू कडू यांनी एका वृत्त पत्राला दिलेल्या मुलाखतीत आपली व्यथा मंडळी आहे. आमची अवस्था ग्रामपंचायतीच्या सदस्यां सारखी झाली आहे. असं ते यावेळी म्हटले.

विधानसभेत कमीत कमी बोलता तरी येते, राज्य मंत्री असल्याने आता ते हि बोलता येत नाही. आमच्या खात्याशी संबंधित घेतलेले निर्णय आम्हाला दुसर्या दिवशी वर्तमान पात्रातून समजतात. राज्य मंत्र्यांना त्यांच्या खात्यांशी संबंधित घेतल्या जाणाऱ्या निर्णयांत दुर्लक्षित केलं जात. कमीत कमी आम्हाला आमच्या खात्याशी संबंधित निर्णयांत कॅबिनेटच्या बैठकांना बोलवावं. अशी आमची अपेक्षा असते, या आधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अजित पवार यांच्या कडे यासंबंधी तक्रार केली आहे, पण त्याचा काहीच परिणाम झाला नाही. अशी बच्चू कडू यांनी आपली व्यथा मांडली. आमच्या खात्याशी संबंधित एखादा चुकीचा निर्णय झाला तर, लोक आम्हाला जाब विचारतात, तेव्हा हे निर्णय फक्त कॅबिनेट मंत्र्यांचा असल्याचं जाहीर करा, असं ही ते या वेळी म्हटले.

हे आघाडीचं सरकार आहे येथे थोडा रुळलायला वेळ लागेल, कॅबिनेटच्या भले खासगी क्षतंत्रातील निर्णयांत राज्यमंत्र्यांना विचारात नका घेऊ, पण सर्वजणी क्षेत्रात तरी आम्हाला विचारात घ्यावं असं राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अपेक्षा व्यक्त केली.

हे सुद्धा वाचा :

आळंदीच्या महाराजांची विद्यार्थ्यास बेदम मारहाण; विद्यार्थी कोमात!

Mahashivratri 2020 : महाशिवरात्री या मुहूर्तावर महादेवाची पूजा करा आणि महत्त्व जाणून घ्या