
सध्या महाराष्ट्रात औरंगाबादमधील महात्मा गांधी मिशन अर्थात एमजीएम विद्यापीठाला लागून प्रियदर्शनी उद्यान आहे जिथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक होणार याचीच चर्चा आहे. चर्चेचा मुख्य कारण अस आहे की शुवसेना प्रमुख बाळासाहेब याचं स्मारक बांधण्यासाठी 1000 झाडे तोडली जाणार अशी सर्वस्त्र चर्चा होत होती. या चर्चेवर औरंगाबादचे महापौर नंदकुमार गोडले यांनी लोकसत्ताच्या वार्ताहरांशी बोलून अफवांचे पूर्णविराम दिला
काही दिवसांपूर्वी मेट्रो कारशेडच्या उभारणीसाठी आरेतील झाडे तोडण्यात आली होती शिवसेनेने कडाडीचा विरोध केला होता. मग तीच शिवसेना आता औरंगाबाद मध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब याच स्मारक बांधनुयासाठी 1000 झाडे तोडण्याची परवानगी देणार का? असा जंटकडूम प्रश्न केला जात होता. यावर सविस्तर खुलासा करत औरंगाबादचे महापौर नंदकुमार यांनी सांगितले की “बाळासाहेबांचं स्मारक उभारण्यासाठी एकही झाड तोडण्यात येणार नाही याचा आम्ही प्रयत्न करू करण स्वतः उद्धव ठाकरे यांनी झाडे न तोडण्याचे आदेश दिले होते व आम्ही स्वतः देखील झाडे तोडण्याच्या विरोधात आहोत”
औरंगाबादमधील महात्मा गांधी मिशन अर्थात एमजीएम विद्यापीठाला लागून असलेल्या प्रियदर्शनी उद्यान येथे १७ एकर जागेवर हे स्मारक होणार असून त्यासाठी ६४ कोटींची मागणी करण्यात आली होती त्यापैकी शासनाकडून ५ कोटी रूपये मिळाले आहे अशी माहिती मिळत आहे.