Home महाराष्ट्र बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो: संजय राऊत

बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो: संजय राऊत

0

राष्ट्रपती राजवट लागल्यानंतरही भाजप शिवसेना वाद शांत झालेला नाही. त्यात आता भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्यावर हा वाद अजूनच गुंतागुंतीचा झाला आहे. “महाराष्ट्रात महायुती जिंकेल आणि देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील, अशी आमची भूमिका होती. पंतप्रधान मोदी व मी तसे जाहीर केले होते. असे असताना दोघांकडे निम्मा-निम्मा काळ मुख्यमंत्रिपद असावे, ही मागणी शिवसेनेने नंतर केली. ती आम्हाला मान्य नव्हती” असे अमित शहा म्हणाले.

यावर शिवसेना आणि विशेषतः संजय राऊत गप्प तरी कसे राहणार.  “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ज्या खोलीत बसत होते त्याच खोलीत शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली. ती खोली आम्हाला मंदिरासमान आहे. बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो… आम्ही खोटं बोलणार नाही, 50-50 चा ठराव ठरला होता. आम्ही खोटं बोलत नाही” असं त्यांनी संजय राऊत यांनी सांगितलं.