Home महाराष्ट्र वाहनचालकांनो सावधान! येणार आहेत नवीन वाहतूक नियम.

वाहनचालकांनो सावधान! येणार आहेत नवीन वाहतूक नियम.

0

गेल्या काही दिवसांपासून वाहतूक नियमांतील बदलांमुळे चालान कापण्यात येण्याच्या बऱ्याच बातम्या आपण ऐकत आहोत. पण नेमके कुठले बदल झाले आहेत आणि हा नेमका काय प्रकार आहे असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल.

केंद्र सरकारने मोटार वाहन कायद्यात अनेक सुधारणा केल्या आहेत. त्यानुसार करण्यात आलेले बदल पुढीलप्रमाणे आहेत.

◆ हेल्मेट न घालता प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वारांना अगोदर १०० रुपये दंड आकारला जायचा. परंतु आता या दंडाची रक्कम ५०० रुपये करण्यात आली असून ३ महिने परवाना निलंबित करण्यात येणार आहे.

◆ विना परवाना गाडी चालवल्यास ५०० रुपये दंड लागायचा तर आता तो ५००० रुपये इतका करण्यात आला आहे.

◆ सीटबेल्ट न लावता गाडी चालवल्यास पूर्वी १०० रुपये दंड होता तर आता १००० रुपये लागणार आहे.

◆ वाहन चालवतांना मोबाईलवर बोलत असल्यास पूर्वी १००० रुपये दंड होता तर आता ५००० रुपये झाला आहे.

◆ दुचाकीवर २ पेक्षा जास्त लोक प्रवास करत असल्यास पूर्वी १०० रुपये दंड होता तर आता २००० रुपये दंड आणि ३ महिने परवाना रद्द करण्यात येणार आहे.

या सुधारित वाहतून नियमांसंबंधातील कायद्याला काही राज्यांनी तूर्तास स्थगिती दिली आहे. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, ओडिशा इत्यादी राज्यांनी जोवर नवीन नियम राज्यातील सर्व लोकांपर्यंत पोहचत नाहीत तोवर अंमलबजावणी करण्यास नकार दिला आहे. म्हणून तुर्तात राज्यात जुन्या नियमांप्रमाणेच दंड आकारले जातील.