Home महाराष्ट्र सत्तास्थापनेसाठी फॉर्म्युला ठरला: मुख्यमंत्री भाजपचाच तर शिवसेनेच्या पदरात महत्त्वाच्या खात्यांसह निम्मी मंत्रिपदे…

सत्तास्थापनेसाठी फॉर्म्युला ठरला: मुख्यमंत्री भाजपचाच तर शिवसेनेच्या पदरात महत्त्वाच्या खात्यांसह निम्मी मंत्रिपदे…

0

शेवटी ती पहाट उजाडलीच; भाजप शिवसेनेतील वाद निवळल्याचे चिन्ह दिसत आहेत व शेवटी सत्तास्थापनेसाठी फॉर्म्युला फायनल झाला आहे. त्यानुसार भाजपकडेच पाच वर्षे मुख्यमंत्रिपद तर शिवसेनेला महत्त्वाच्या खात्यांसह निम्मी मंत्रिपदे, असा एकंदरीत सत्तास्थापनेचा फॉर्म्युला निश्चित झाला असून पुढील काही दिवसांत याची घोषणा होईल असे सांगितले जात आहे. दोन्ही पक्षात थेट चर्चा झाली नसली तरी माध्यस्थांमार्फत हा फॉर्म्युला ठरला अशी माहिती मिळत आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व नीरज गुंडे याच्या मध्यस्थीने हा फॉर्म्युला ठरला आहे. रा. स्व. संघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी काल चर्चा केली. संघाचे वरिष्ठ पदाधिकारी व उद्धव ठाकरे यांचे चांगले संबंध आहेत म्हणून त्यांनी हा पुढाकार घेतल्याचे म्हटले जात आहे. तर नीरज गुंडे यांनीही मध्यस्थी म्हणून भूमिका निभावली. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जवळचे तर आहेतच सोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या दोघांचेही स्नेही आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी युतीचा फॉर्म्युला ठरविण्यातही त्यांनी मध्यस्थ म्हणून पुढाकार घेतला होता.