
थोड्याच दिवसाआधी कोरोनवर यशस्वी मात करून परत आलेल्या राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांना ट्विटर वरून एक धमकी मिळाल्यामुळे खळबळ उडाली आहे.
एका ट्विटर यूजर ने एक आक्षेपार्ह ट्विट करत असे म्हटले आहे की, ” भिडे गुरुजी आणि मंडळी तुमची वाट बघत आहेत घराबाहेर पडू नका नाहीतर…” अशा आशयाचे ट्विट केले.
या ट्विट नंतर जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा ट्विट करत म्हटले आहे की, ” हा प्रकार गंभीर नाही का? याची दखल कोण घेणार? ही थेट जीवे मारण्याची धमकी आहे. मला आशा आहे की, संबंधित यंत्रणा याची दखल घेतील”
काही दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात एका अभियंताने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा मुद्दा चांगलाच गाजला होता.