Home महाराष्ट्र ‘माझ्यामुळे आदित्य ठाकरेंसमोरचं आव्हान वाढणार’; अभिजित बिचुकलेंचा वरळीतून उमेदवारी अर्ज दाखल

‘माझ्यामुळे आदित्य ठाकरेंसमोरचं आव्हान वाढणार’; अभिजित बिचुकलेंचा वरळीतून उमेदवारी अर्ज दाखल

0

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे वरळी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवणार असून निवडणूक लढवण्याची ही त्यांची पहिली वेळ आहे हे आपण ऐकतच आहोत. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून आतापर्यंत आदित्य यांना टक्कर देण्यासाठी वरळी मतदारसंघात एकही तगडा उमेदवार मिळाला नव्हता. पण आज बिग बॉस मराठी २ मधून गाजलेले अभिजित बिचुकले यांनी वरळी मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करून आदित्य ठाकरेंना आव्हान केले आहे असे नुकत्याच आलेल्या वृत्तावरून समजले.

आदित्य ठाकरेंनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांच्या विरोधात कोण निवडणूक लढवणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले होते. राष्ट्रवादी काँग्रेसने काल डॉ. सुरेश माने यांना वरळी मतदारसंघातून उमेदवारी दिली. त्यानंतर आज बिग बॉस मराठी फेम अभिजित बिचुकले यांनी अपक्ष उमेदवार म्हणून वरळी मतदारसंघात पाऊल ठेवल्यापासून राज्यात चर्चेला उधाण आले आहे. ‘मला निवडून द्याल तर मी एका दिवसात प्रशासनाला सरळ करेल’ असे बिचुकले म्हणाले. तसेच त्यांची पत्नी अलंकृता बिचुकले साताऱ्यातून निवडणूक लढवणार असून उदयनराजेंना आव्हान देणार आहे असेही त्यांनी सांगितले. याशिवाय राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांचे पंतप्रधान होण्याचे स्वप्न आपण स्वतः पंतप्रधान होऊन पूर्ण करून दाखवू असे आश्वासन त्यांनी दिले. पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.