Home महाराष्ट्र भाजप नेते पुन्हा राज्यपालांच्या भेटीला, गायब होणाऱ्या मृतदेहांच्या प्रकारणात हस्तक्षेप करण्याची मागणी

भाजप नेते पुन्हा राज्यपालांच्या भेटीला, गायब होणाऱ्या मृतदेहांच्या प्रकारणात हस्तक्षेप करण्याची मागणी

0

भाजप नेते किरीट सोमय्या आणि सहकाऱ्यांनी यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली आहे. मुंबईतील रुग्णालयांमधून कोरोना बाधित रुग्णांचे मृतदेह गायब केले जात असल्याचा धक्कादायक दावा सोमय्या यांनि केला आहे. यावेळी गृह व आरोग्य सचिवांना या प्रकरणात लक्ष घालण्यास सांगणार असल्याचे आश्वासन राज्यपालांनी दिले.

अर्धा डझन कोरोना बाधितांना हॉस्पीटल नी गायब घोषित केले त्यानंतर त्यांचा मृतदेह सापडल्यानंतर संबंधित रुग्णालयातच या रुग्णांचे मृतदेह आढळले. या रुग्णांवरील उपचाराचे बिलही नंतर नातेवाईकांना देण्यात आले. हा सारा प्रकार चिंताजनक असून याप्रश्नी आपण लक्ष घालावे व सरकारला योग्य त्या सूचना द्याव्या अशी मागणी सोमय्या यांनी राज्यपालांकडे केली.

गेल्या आठवडाभरात मुंबईतील विविध रुग्णालयांमधून सहा मृतदेह गायब झाल्याचा आरोप करत सोमय्या यांनी त्याबाबत तपशील दिला आहे. मुंबईत करोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात हेळसांड होत असून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी सोमय्या यांनी केली. यापूर्वी त्यांनी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे व गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.