Home महाराष्ट्र ‘३० तासांत नाही तर ३० मिनिटांत बहुमत सिद्ध करू’- राऊत “बीजेपी...

‘३० तासांत नाही तर ३० मिनिटांत बहुमत सिद्ध करू’- राऊत “बीजेपी का खेल खत्म।”

0

महाराष्ट्राच्या महानाट्यमय राजकारणावर सोमवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने मंगळवारी निर्णय देण्याचे स्पष्ट केले होते आणि आज यावर निकाल आला असून, झालेल्या सुनावणीनुसार न्यायालयाने भाजप सरकारला उद्या अर्थात बुधवार दिनांक २६ नोव्हेंबर सायंकाळी ५.०० पर्यंत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.

जवळपास सर्वच पक्षांनी न्यायालयीन निर्णयाचे स्वागत केले असून महाशिवआघाडी विशेष उत्साहात दिसत आहे. न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत करत एकीकडे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ‘सत्यमेव जयते, भाजपचा खेळ संपला’ असं ट्वीट केलं…

तर दुसरीकडे  शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंट वरून
“सत्य परेशान हो सकता है..
पराजित नही हो सकता…
जय हिंद!!”
असं ट्विट करून न्यायालयीन निर्णयावर आनंद व्यक्त केला. त्याचबरोबर राऊत प्रसार माध्यमांशी बोलतांना म्हणाले, “बहुमत सिद्ध करायला ३० तास कशाला ३० मिनिटं देखील पुरेशी आहेत.” असा टोला त्यांनी भाजपला दिला आणि “महाविकासआघाडी बहुमत सिद्ध करून सत्ता स्थापन करणार” असा खात्रीशीर दावा राऊत यांनी केला.

संजय राऊत यांचं ट्विट…