भाजपाने आपला 5 वर्ष मुख्यमंत्री पदाचा हट्ट सोडला असून शिवसेनेला सुरुवातीची अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद देण्यासाठी तयार असल्याची माहिती मिळत आहे. महासेनाआघाडी आघाडी सत्ता स्थापनेच्या अंतिम टप्यात असताना भाजपने घेतलेला हा निर्णय महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारा आहे. लोकसत्ता दैनिकाने ही माहिती दिली असून यावर कुठली जाहीर चर्चा अद्याव झालेली नाही. मात्र भाजपा माघार घेतली तर आता शिवसेना पेचात अडकणार हे मात्र निश्चित आहे.
माहुमत मिळूनही विरोधी पक्षात बसण्याची भीती किंवा सत्तेपासून दूर राहण्याच्या भीतीने भाजपने ही माघार घेतली असावी अशी चर्चा होत आहे. मीडिया रिपोर्ट नुसार भाजपच्या एक बड्या नेत्याने ‘मातोश्री’वर तडकाफडकी प्रस्ताव देखील पाठवल्याचं बोललं जातं आहे मात्र tv9 च्या वार्ताहरांशी बोलतांना संजय राऊत यांनी ‘असा कुठलाही प्रस्ताव आलेला नाही” असे सांगितले. एकंदरीतच राजकीय हालचाली पाहता पडद्या मागे नेमकं काय शिजतंय हे आत्ताच नक्की सांगता येणार नाही मात्र लवकर सत्ता स्थापनेचा काय तो एक सोक्षमोक्ष लागेल अशी चिन्ह आहेत.