Home महाराष्ट्र Breaking news: नारायण राणे करणार भाजप प्रवेश

Breaking news: नारायण राणे करणार भाजप प्रवेश

0

विधानसभा निवडणुका ऐन तोंडावर असतांना भाजपात मेगाभरती सुरू आहे. अशातच महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष तसेच राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे भाजपप्रवेश करणार आहेत अशी बातमी समोर आली आहे. २ ऑक्टोबरला सायंकाळी ४ वाजता ते अधिकृतरित्या भाजपात प्रवेश करणार असून आपल्या स्वाभिमान पक्षाचे भाजपात एकत्रीकरण करणार आहेत अशी माहिती मीडिया न्यूजमधून मिळाली.

अगोदर शिवसेना, नंतर काँग्रेस आणि त्यानंतर स्वतःचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष असा नारायण राणेंचा आतापर्यंतचा राजकारणातील प्रवास राहिला आहे. यादरम्यान त्यांनी एकदा मुख्यमंत्रीपद आणि बऱ्याचदा मंत्रीपदही भूषवले आहे. १ ऑक्टोबर २०१७ ला त्यांनी स्वतः ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची’ स्थापना केली. त्यानंतर आता ते भाजपात प्रवेश करणार असल्याचे कळले आहे. काही दिवसांपूर्वीच नारायण राणे स्वतःच याबद्दल बोलले होते की ते भाजपात जाण्यासाठी इच्छुक आहेत. परंतु त्यांच्या म्हणण्यानुसार शिवसेनेचा विरोध असल्यामुळे इतके दिवस त्यांना भाजपात प्रवेश करता आला नाही. आता त्यांना भाजपात थेट प्रवेश मिळणार असून ते कुडाळ-मालवण मतदारसंघातून निवडणूक लढवतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात चालू झाली आहे.