
खंबाटकी घाटात बर्निग कारचा थरार, नशिबाने अनर्थ टळला. ‘पुढारी’ वेब पोर्टलच्या एका ऐपोर्ट नुसार, खंबाटकी घाटमाथ्यावर साताऱ्याकडे जाणारी एक होंडा CRV कार जीच नंबर होता MH 11 CH 1888 ! या कारने अचानक पेट घेतला. चालकाने वेळीच दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. चालकाने गाडी रस्त्याच्या बाजूला घेतली व तातडीने गाडी रिकामी केली.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार ही घटना आज सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. गाडीतून बाहेर पडताच काही क्षणातच संपूर्ण गाडीने जोरदार पेट घेतला. घटनेची माहिती मिळताच हायवे हेल्पलाईनचे कर्मचारी व खंडाळा पोलिसांनी घटनास्थळी येऊन पोहचले. पाण्याचे टँकर बोलावून ही आग विझवण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आले. मात्र संपूर्ण आग विझेपर्यंत कार जवळपास पूर्ण जळाली होती. या व्यतिरिक्त ही कार RK टूर्स अॅण्ड ट्रॅव्हल्सच्या मालकीची असल्याची माहिती मिळत आहे.