Home महाराष्ट्र आता बसेस 100 टक्के प्रवासी क्षमतेने धावणार; एसटी महामंडळाने जारी केले आदेश.

आता बसेस 100 टक्के प्रवासी क्षमतेने धावणार; एसटी महामंडळाने जारी केले आदेश.

0

एसटी महामंडळाने आता एसटीच्या लांबपल्ल्याच्या आणि मध्यम पल्ल्याच्या बसेस या पूर्वीप्रमाणेच पूर्ण शंभर टक्के प्रवासी क्षमतेने चालविण्यात येतील असे आदेश गुरूवारी काढले आहेत. हे आदेश 18 सप्टेंबर पासून लागू करण्यात येत आहे.

कर्नाटक आणि गुजरात राज्यांमध्ये 100 टक्के प्रवासी क्षमतेने एसटी सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळेच याच धर्तीवर राज्य परिवहन मंडळाच्या बसेसमध्येही पूर्ण आसन क्षमतेने गाडय़ा चालविण्याचे आदेश एसटी महामंडळाचे महाव्यवस्थापक (वाहतूक) राहुल तोरो यांनी काढले आहेत. तसेच लोकांनी स्वतःची काळजी पण घ्यावी.

पूर्वीप्रमाणे आताही जेष्ठ नागरिकांना आणि मुलांच्या प्रवासावर निर्बंध असणार आहे. केवळ ज्येष्ठ नागरीकांना वैद्यकीय कारण तसेच अपवादात्मक स्थितीत प्रवास करण्यास परवानगी देण्यात येणार आहे. आता पूर्वीप्रमाणे बसेसची सर्व सीट आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात येतील. अशी संपूर्ण माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे.