Home महाराष्ट्र शिवभोजनाला मंत्रिमंडळाने दिली मान्यता : प्रत्येक जिल्ह्यांत मिळणार १० रुपयात जेवण

शिवभोजनाला मंत्रिमंडळाने दिली मान्यता : प्रत्येक जिल्ह्यांत मिळणार १० रुपयात जेवण

0

१० रुपयाच्या जेवण या योजनेला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. या थाळीत १० रुपयांमध्ये दोन पोळ्या, भाजी, वरण आणि भात यांचा समावेश असणार आहे. अधिक मिळालेल्या माहिती नुसार राज्य सरकार ही योजना प्रायोगिक तत्वाववर सुरु करीत आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्यात राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या किमान एक भोजनालय असणार आहे याला जर उत्तम प्रतिसाद मिळाला तर राज्याच्या इतर भागात ही योजना राबवण्यात येईल.

मीडिया रिपोर्ट नुसार या थाळीला शिवभोजन असे नाव देण्यात आले असून ३ महिन्यांसाठी या योजनेला ६ कोटी ४८ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. समान्यता एका भोजनालयामध्ये ५०० थाळी सुरु करायला मान्यता मिळाली आहे. शिवभोजनाचा लाभ बारा त दोन या वेळेत घेता येईल, थाळीमध्ये प्रत्येकी ३० ग्रॅमच्या दोन चपात्या, १०० ग्रॅमची एक वाटी भाजी, १५० ग्रॅमचा भात आणि १०० ग्रॅमचे एक वाटी वरण या पदार्थांचा समावेश असणार आहे.