Home महाराष्ट्र कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाडांना कोरोणाची लागण, संपर्कातील बंगल्यावरील कर्मचारी सुद्धा बाधित

कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाडांना कोरोणाची लागण, संपर्कातील बंगल्यावरील कर्मचारी सुद्धा बाधित

0

6राष्ट्रवादी काँग्रेसचे आक्रमक नेते आणि महाविकासआघाडी सरकारमधील सार्वजनिक बांधकाम मंत्री जितेंद्र आव्हाड यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. ४ दिवसांपूर्वी प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना सोलापूरहून ठाण्याला हलवण्यात आलं होतं. याशिवाय सोलापूरच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारीही त्यांच्याकडून काढून घेऊन राज्यमंत्री असलेल्या दत्तात्रय भरणे यांच्याकडे देण्यात आली होती. बुधवारी रात्री उशिरा याबाबतची माहिती देण्यात आली.

मुंब्रा-कळवामधील एका पोलीस अधिकाऱ्याच्या संपर्कात आल्याने जितेंद्र आव्हाडांना कोरोनाची लागण झाली असल्याचं स्पष्ट झालं आहे. हा पोलीस अधिकारी तब्लिगी प्रकरणाचा तपास करत असताना २१ परदेशी नागरिक, १३ बांगलादेशी आणि ८ मलेशियन नागरिकांच्या संपर्कात आला होता. मुंब्रा आणि कळव्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची चौकशी करण्यासाठी आव्हाडांनी या अधिकाऱ्याची भेट घेतली, तेव्हाच संपर्कातून विषाणू संक्रमित झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान जितेंद्र आव्हाड यांच्या संपर्कातील १५ जणांना होम क्वारंटाईन करण्यात आलं असून पुढील १४ दिवसांत त्यांना घराबाहेर पडता येणार नाही. याशिवाय त्यांच्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संपर्कातील १०० जणांची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे.

आता आव्हाड यांच्यावर मुंबईच्या सरकारी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती उत्तम असून काळजी करण्याचे कारण नसल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दूरध्वनीवरून आव्हाड यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. काही दिवसांपूर्वी आव्हाड यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्याचा अहवालही निगेटिव्ह आला होता. तरीही आव्हाड यांनी स्वतःला सेल्फ क्वारंटाईन केले होते.मात्र आता कोरोनाचा दुसरा रिपोर्ट पॉसिटीव्ह आला आहे. आधी ठाणे मध्ये रुग्णालयात दाखल केलेलं आव्हाड आता मुंबईला हलवण्यात आले आहेत.