विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने महाराष्ट्रात आचारसंहिता असतांना एका गाडीत तब्बल एक कोटींची रोकड मिळाली असून पोलिसांनी ही रक्कम जप्त केली आहे. मुंबईतील कांदिवली परिसरात समता नगर येथे पोलसांनी ही रक्कम जप्त केली असून ९ जणांवर कारवाई करत अटक केली आहे.
कायमच निवडणुकीच्या दरम्यान अशा घटना निदर्शनात येतात. यंदाही निवडणुकीमध्येही पोलिसांनी संशयास्पद गाड्यांचा तपास करायला सुरुवात केली आहे. यादरम्यान कांदिवली येथे पश्चिम द्रुतगती महामार्गावर शुक्रवारी रात्री पोलिसांनी नाकेबंदी केली असता रात्री साडेअकरा वाजता एका गाडीतून भरपूर रक्कम नेण्यात येणार आहे अशी टीप पोलिसांना मिळाली होती. दरम्यान ग्रोवेल्स मॉलजवळील सर्व्हिस रोडवर एसयुव्ही कारची झडती घेतली तेव्हा ही रक्कम पोलिसांच्या हाती लागली. या प्रकरणात ९ आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास चालू आहे.