Home महाराष्ट्र चलो अयोध्या! उद्धव ठाकरेंसह असंख्य शिवसैनिकांचा अयोध्या दौरा

चलो अयोध्या! उद्धव ठाकरेंसह असंख्य शिवसैनिकांचा अयोध्या दौरा

0

येत्या ७ मार्चला शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे व असंख्य शिवसैनिक अयोध्येला जाणार आहेत असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जाहीर केले आहे. दुपारी प्रभू श्रीरामांच दर्शन घेऊन संध्याकाळी शरयू आरती असे या दौऱ्याचे स्वरूप असेल असेही ते यावेळी म्हणाले. तमाम शिवसैनिकांना या दौऱ्यात विक्रमी हजेरी लावा असे आवाहन सुद्धा त्यांनी केली. ठाकरे सरकारच्या १०० यशस्वी दिवसांचे निमित्त या दोऱ्यामागे असल्याचे कळून येते. 

२९ नोव्हेंबर २०१९ ला उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. येत्या मार्चमध्ये या सरकारला यशस्वी १०० दिवस पूर्ण होतील. त्यानंतर उद्धव ठाकरे प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी जाणार आहेत. 

गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीला मोठं यश मिळालं होतं. महाराष्ट्रातील ४८ जागांपैकी भाजपने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यावर गेले होते. १५ जून २०१९ रोजी उद्धव यांचा अयोध्या दौरा पार पडला. पण त्यानंतर या युतीत द्वंद्व पेटून समोर काय झाले हे अखंड महाराष्ट्राने पाहिलेचं आहे. मुख्यमंत्री असतांना हा उद्धव ठाकरेंचा पहिलाच अयोध्या दौरा असणार आहे. 
राम मंदिर हा शिवसेना-भाजप युतीचा लोकसभा निवडणुकीपूर्वीचा महत्त्वाचा अजेंडा होता. 

https://twitter.com/rautsanjay61/status/1231118313465483264?s=19