Home महाराष्ट्र छगन भुजबळांचा शिवसेनेला सल्ला, म्हणाले “मुख्यमंत्री पदासाठी अडून राहण्याची हीच ती वेळ”

छगन भुजबळांचा शिवसेनेला सल्ला, म्हणाले “मुख्यमंत्री पदासाठी अडून राहण्याची हीच ती वेळ”

0

राज्यात सत्तेचा तिढा सुटता सुटत नाहीये. भाजप आणि शिवसेनेच्या जोरदार रस्सीखेच मध्ये नक्की मुख्यमंत्री पद कुणाला आणि महत्वाची खाती कुणाला जाणार हे काही निश्चित होत नाहीये. अशात या सत्तासंघर्षावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी शिवसेनाला एक सल्ला दिला आहे.

मीडिया न्यूज नुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अर्थात शरद पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला जाण्यापूर्वी प्रसार माध्यमांशी बोलतांना छगन भुजबळ यांनी शिवसेनेला एक मोलाचा सल्ला दिला. “शिवसेनेसाठी हीच ती वेळ आहे. त्यांनी आपल्या मागणीवर ठाम राहिले पाहिजे,” असे छगन भुजबळ यांनी म्हटले.

सत्तेचा तिढा अद्याप सुटला नसला तरी शपथ विधीसाठी वानखेडे स्टेडियम बुक करण्यात आले आहे अर्थात लवकरच काय तो निर्णय होऊन खाती वाटप व शपथविधी होण्याची चिन्ह दिसत आहेत.