Home महाराष्ट्र मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं नरेंद्र मोदींना...

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं नरेंद्र मोदींना पत्र!

0

आपली बोलीभाषा अर्थात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना याना पत्र पाठवले आहे! उद्धव ठाकरे म्हणतात ‘नरेंद्र मोदी यांनी स्वत: लक्ष घालून आवश्यक कार्यवाही करावी व भाषेला अभिजात भाषेचा दर्जा असे निर्देश संबंधितांना द्यावे, अशी विनंती केली आहे.

ABP माझा च्या एका रिपोर्ट नुसार ‘मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवा या बाबत महाराष्ट्र शासनाच्या तज्ज्ञ समितीच्या अहवालाच्या आधारे केंद्र सरकारकडे 16 नोव्हेंबर 2013 रोजी प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्याचबरोबर असेही निष्पन्न झाले आहे की, अभिजात भाषेचा दर्जा मिळविण्यासाठी आवश्यक निकष मराठी भाषा पुर्ण करते. मिळालेल्या अधिक माहिती नुसार अनेकदा पाठपुरावा करूनही केंद्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयाकडे हे प्रकरण प्रलंबित आहे. याचाही उल्लेख ठाकरे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. आता मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणार का हे वेळचं सांगेल