Home महाराष्ट्र पूर्व विदर्भातील पावसाने झालेल्या नुकसानामध्ये नागरिकांना मिळणार सर्व प्रकारची मदत!

पूर्व विदर्भातील पावसाने झालेल्या नुकसानामध्ये नागरिकांना मिळणार सर्व प्रकारची मदत!

0

पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, चंद्रपूर व गडचिरोली या चार जिल्ह्यात पुरामुळे ५०० कोटींपेक्षा अधिकचे आर्थिक नुकसान झाले आहे तसेच पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी या भागातील ४० गावांचा त्यांनी प्रत्यक्ष दौरा केला असून पुरात सर्वस्व गमावून बसलेल्या प्रत्येक कुटुंबाला केंद्र सरकारनेही आजवर दिली नाही, अशी सर्व प्रकारची मदत देण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, हा पूर मध्यप्रदेश सरकारच्या चुकीमुळेच आला असा ठाम दावा त्यांनी केला.

कोविड प्रमाणेच पूर्व विदर्भात पूरपरिस्थिती अतिशय भयानाक असल्याचे पत्रकारांशी बोलतांना वडेट्टीवार यांनी सांगितले. भंडारा या जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले असून त्या पाठोपाठ, चंद्रपूर, नागपूर व गडचिरोली येथे मोठी हानी झाली आहे.

त्यांनी स्वत: चार जिल्ह्यातील ४० गावांना भेटी देवून लोकांचे दु:ख व समस्या जाणून घेतले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, १९९४ नंतर प्रथमच अशा प्रकारचा पूर या भागातील लोकांनी बघितला.

ज्यांचे घर पूर्णत: पडली त्यांना घर बांधकामासाठी तर ज्यांचे घरांचे नुकसान झाले त्यांना दुरूस्तीसाठी केंद्र सरकारने आजवर दिली नाही ती सर्व प्रकारची मदत दिली जाणार आहे. तात्पूरती मदत १६ कोटी ४८ लाख जाहीर केली आहे. लवकरच आणखी मदत जाहीर करणार आहे.अन्न,धान्यापासून रॉकेल, कपडे देखील पुरविण्यात येणार आहे.