Home महाराष्ट्र महाशिवआघाडीकडून सत्ता स्थापनेचा दावा; सोबतच १६२ आमदारांच्या सह्यांचे पत्र केले सादर!

महाशिवआघाडीकडून सत्ता स्थापनेचा दावा; सोबतच १६२ आमदारांच्या सह्यांचे पत्र केले सादर!

0

शिवसेनेचे एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे जयंत पाटील आणि काँग्रेसचे अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात आणि शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी आज राजभवनात जाऊन सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. आज एकीकडे महाराष्ट्रातील सत्तापेचावर सुप्रीम कोर्टात सुनावणी होती तर दुसरीकडे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने यांचा सत्तास्थापनेचा दावा.

सत्ता स्थापनेच्या दाव्यासह तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी पत्र सादर केले. मीडिया रिपोर्ट नुसार या पत्रासह एकनाथ शिंदे, जयंत पाटील आणि बाळासाहेब थोरात यांच्या पाठींब्यासह एकूण १६२ आमदारांच्या सह्या असलेली यादी जोडण्यात आली आहे. जर भाजपला विश्वासदर्शक ठराव जिंकता आला नाही तर राज्यपालांनी शिवसेना, राष्ट्रवादी-काँग्रेसला सत्तास्थापनेसाठी आमंत्रित करावे अशी विनंतीही या तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी केली आहे. बहुमत नसतांना भाजपने सत्ता स्थापनेचा दावा करून शपथविधी उरकला. मात्र ते बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरतील अशी खात्री या तीनही पक्षांच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे.