Home महाराष्ट्र वर्षानुवर्षे हिरवे असणारे लोणार सरोवराचे पाणी अचानक झाले गुलाबी, परिसरात गर्दी उसळली

वर्षानुवर्षे हिरवे असणारे लोणार सरोवराचे पाणी अचानक झाले गुलाबी, परिसरात गर्दी उसळली

0

जगातले खाऱ्या पाण्याचे उल्कापाताने निर्माण झालेले तिसऱ्या क्रमांकाचे सरोवर म्हणून लोणार हे आपल्या सगळ्यांनाचं माहिती आहे बहुतेक लोकांनी या सरोवराला कधी न कधी भेट दिलीच असेल. पण अशा या सरोवराबद्दल थोड्या दिवसापासून विचित्र बदल झाले आहेत, हजारो वर्षांपासून हिरव्या रंगाचे पाणी असलेले हे सरोवर आता अचानक लाल किंवा गर्द गुलाबी रंगाचे दिसत आहे.

शास्त्रज्ञ लोक ह्या एकाएकी झालेल्या बदलांमुळे अचंबित झाले आहेत, एका तज्ज्ञ जल शास्त्रज्ञांच्या मते सरोवरातील हेलोबॅक्टेरीआ आणि ड्युनेलिला सालिना नावाच्या कवकाची अत्यंत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून त्यामुळे कॅरेटोनाईड नावाचे रंगद्रव्य विसर्जित होते त्यामुळे हे पाणी लालसर दिसत आहेत, असे असले तरी हे कवक एवढ्या मोठ्या प्रमाणात कसे काय वाढले हा प्रश्न अनुत्तरित आहे.

दरम्यान लोणार सरोवराची निर्मिती ही जवळजवळ ५००० वर्षांपूर्वी एका उल्कापाताने झाली होती, या सरोवराचा अभ्यास करण्यासाठी जगभरातून शास्त्रज्ञ येथे भेट देत असतात. विविध संशोधनातून हे सिद्ध झाले आहे की लोणार सरोवरातील मातीचे आणि चंद्रावरील मातीचे नमुने हे एकसारखे आहेत. सरोवराच्या जवळ मध्ययुगीन काळातीळ वास्तुशिल्पे आहेत.