Home महाराष्ट्र शरद पवारांना जीवे मारण्याचा कट रचणाऱ्या त्या लोकांवर तक्रार दाखल 

शरद पवारांना जीवे मारण्याचा कट रचणाऱ्या त्या लोकांवर तक्रार दाखल 

0

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हत्येचा कट केला जात असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. एबीपी माझाच्या एका मीडिया रिपोर्टनुसार सोशल मीडियावर शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पुण्याच्या शिवाजी नगर येथील सायबर पोलीस ठाण्यात २ व्यक्तींवर तक्रार दाखल करण्यात आली आहे. राष्ट्रवादी कार्यकर्ते खाबिया यांनी सदर तक्रार नोंदवली आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार पत्रकार भाऊ तोरसेकर आणि घनश्याम पाटील यांनी त्यांच्या द पोस्टमन या युट्युब चॅनलवर शरद पवारांवर टीका करणारे बरेच व्हिडीओ टाकले असून पवारांना संपवले पाहिजे असे भाष्य केले. तसेच या व्हिडिओवर अनेक वादग्रस्त कमेंट्सही आढळून आल्या आहेत ज्यात शरद पवारांना मारण्याचे बेत आखले जात आहेत. या सर्व प्रकाराची दखल घेत खाबिया यांनी तातडीने सायबर पोलिसांकडे तक्रार नोंदवली.