Home महाराष्ट्र उद्धव ठाकरे आणि कोशियारी यांच्यात द्वंद्व? राज्यपालांच्या बैठकीला मुख्यमंत्री गैरहजर

उद्धव ठाकरे आणि कोशियारी यांच्यात द्वंद्व? राज्यपालांच्या बैठकीला मुख्यमंत्री गैरहजर

0

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी विरोधी पक्षाच्या मागणीवरून राज्यातील परिस्तिथीचा आढावा घेण्यासाठी राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना बैठकीसाठी बोलावले. मात्र उद्धव ठाकरे या बैठकीला गैरहजर राहिले व बैठकीतील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आपले स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांना पाठवले. शिवसेनेचे इतर मंत्रीदेखील या बैठकीत अनुपस्थित होते.

“कोरोनाचे संकट हाताळणीत राज्य सरकार हे सपशेल अपयशी ठरले आहे. राज्य सरकारचा प्रत्येक बाबतीतला नाकर्तेपणा समोर येत आहे”, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना मंगळवारी दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
राज्यपालांना भेटलेल्या शिष्टमंडळात माजी मंत्री विनोद तावडे, आशीष शेलार, खा. गोपाळ शेट्टी, खा. मनोज कोटक, आ. अतुल भातखळकर यांचा समावेश होता. ‘राज्य सरकारच्या निष्क्रियतेमुळे सर्वाधिक कोरोना रूग्ण आणि सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात दिसून येतात. ही संख्या दररोज वाढतच आहे. अनेक लोकांना उपचार मिळत नाहीत. कोणत्या रूग्णालयात किती खाटा शिल्लक आहेत, याची कुठलीही माहिती दिली जात नाही,’ असे फडणवीस यांनी म्हटले होते.

शिवसेना मात्र विरोधी पक्षाच्या या भूमिकेला वेगळे वळण देऊ पाहत आहे, त्यांच्या मते विरोधक हे कोरोनाचा फायदा घेत सरकार खिळखिळे करू पाहत आहे मात्र हे सरकारला जेवढा त्रास द्याल तेवढे हे सरकार मजबूत बनतं जाईल.