Home महाराष्ट्र एनपीआर लागू करण्याच्या निर्णयामुळे महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षांमध्ये तीव्र मतभेद

एनपीआर लागू करण्याच्या निर्णयामुळे महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षांमध्ये तीव्र मतभेद

0

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये अंतर्गत वाद चालू असल्याचे बोलले जात आहे. मीडिया न्यूजनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात १ मे पासून एनपीआर अर्थात नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर चालू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एनपीआरला विरोध दर्शवला आहे. एनपीआर आणि एनआरसी यांच्यात साम्य असल्याचे काँगेसचे मत आहे. त्यामुळे राज्यातील सत्ताधारी पक्षांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलीसनामा च्या मीडिया न्यूजनुसार याआधी देखील सत्ताधारी पक्षांमध्ये मतभेद झाले आहेत. राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी भीमा कोरेगाव प्रकरणाशी संबंधित एल्गार परिषदेचा तपास करण्यास तसेच त्यासाठी एनआयएकडे हे प्रकरण देण्यास विरोध दर्शवला होता मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्यांना न जुमानता एल्गार परिषदेचे तपासकार्य एनआयएकडे सोपवले. त्यामुळे या पक्षांमध्ये पूर्वीपासूनच मतभेद होत असल्याचे दिसून येत आहे. विरोधी पक्ष याचा फायदा घेत असून महाविकास आघाडीच्या सरकारवर टीका करत आहेत. “आघाडीत बिघाडी” असे शब्दप्रयोग वापरून विरोधी पक्षांकडून सत्ताधारी पक्षांमधील अंतर्गत मतभेदांची खिल्ली उडवली जात आहे.