Home महाराष्ट्र ग्रांट हयात मध्ये शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी मिळून १६२ नव्हे १३० आमदार होते:...

ग्रांट हयात मध्ये शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी मिळून १६२ नव्हे १३० आमदार होते: नारायण राणे

0
shivsena

प्राईम नेटवर्क : राष्ट्रवादीतून बंडखोरी करत बाहेर पडल्यानंतर अजित पवारांनी अचानक उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, आणि राज्यात एकच हाहाकार माजला. यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून सत्ता स्थापनेचे दावे होऊ लागले. अर्थात राज्यपालांनी भाजपला ३० नोव्हेंबर पर्यंतची मुदत दिली आहे. त्यामुळे या तिन्ही पक्षांना वाट पाहण्या खेरीज पर्याय उरला नाही.

अशात या तिन्ही पक्षांनी आज (सोमवार) मुंबईमध्ये ग्रॅण्ट हयात हॉटेल मध्ये तिन्ही पक्षांच्या आमदारांना बोलवण्यात आलं होतं. यावेळी आम्ही १६२ अशी टॅग लाईन दिली. या निमित्त महाविकास आघाडीचं शक्ती बळ तपासणं हा त्या मागील उद्देश्य होता.

भाजप नेते नारायण राणे यांनी दावा केला आहे की, यावेळी १६२ नव्हे तर १३० आमदार कार्यक्रमाला हजर होते असं सांगितलं. नारायण राणे यांचं निवास्थान ग्रॅण्ट हयात च्या अगदी जवळ आहे, तसेच काँग्रेस, शिवसेनेच्या आपल्या मित्र असलेल्या आमदारांनी हि माहिती आपल्याला दिली असल्याचं राणे यावेळी बोलले. नारायण राणे एबीपी माझा या वृत्त वाहिनीशी यावेळी बोलत होते.

या बैठकीत या तीन हि पक्षांच्या आमदारांना प्रामाणिक पणाची शपथ देण्यात आली.