Home महाराष्ट्र “काँग्रेस राष्ट्रवादीने सुद्धा राममंदिराच्या बांधणीसाठी हातभार लावावा”: संजय राऊत

“काँग्रेस राष्ट्रवादीने सुद्धा राममंदिराच्या बांधणीसाठी हातभार लावावा”: संजय राऊत

0

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अयोध्या दौऱ्यावर जात आहेत या गोष्टीकडे राजकाराणापेक्षा धार्मिक भावनेनं पाहावं, असं मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मांडलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या या दौऱ्याअगोदर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतांंना इतर पक्ष आणि शिवसेनेच्या विचारधारेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत असतात यातच राऊत यांनी काँग्रेस-एनसीपीनं राम मंदिर निर्माणात हातभार लावावा अशी भावना व्यक्त केली.

राम मंदिर ही कोणचीही एकाची प्रॉपर्टी नसून हे मंदिर देशातल्या प्रत्येक नागरिकाचं आहे. या मंदिर निर्माणात शिवसेना मोठ्या संख्येने सहभागी होणार असून त्याचबरोबर इतरांना सुद्धा हातभार लावण्याचं आवाहन संजय राऊत यांनी केलं. आज सरकारच्या यशस्वी १०० दिवसांंचे औचित्य साधून उद्धव ठाकरे असंख्य शिवसैनिक घेऊन अयोध्या दौऱ्यासाठी निघणार आहेत. हा नियोजित दौरा यशस्वी पार पडावा यासाठी अनेक प्रयत्न सुरू आहेत पण अयोध्येतील संतांनी मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांना विरोध करण्याचा इशारा दिला आहे.