Home महाराष्ट्र काँग्रेसच्या ५१ उमेदवारांची पहिली यादी जाहीर…

काँग्रेसच्या ५१ उमेदवारांची पहिली यादी जाहीर…

0

विधानसभा निवडणुका अवघ्या २२ दिवसांवर असल्यामुळे राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. अशातच काँग्रेसने ५१ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. याशिवाय शिवसेनेने युतीवर शिक्कामोर्तब होण्याआधीच ९ उमेदवारांना मातोश्रीवर एबी फॉर्मचे वाटप केले. तसेच भाजपने देखील ३२ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

काँग्रेसच्या पहिल्या यादीनुसार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांची मुलगी प्रणिती शिंदे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, नितीन राऊत, अमित देशमुख, विश्वजित पवार अशा दिग्गज नेत्यांना उमेदवारी देण्यात आली आहे असे समजले. एकीकडे भाजप शिवसेना युतीचे घोडे अजूनही अडले असतांना काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे जागावाटप पक्के झाले आहे. प्रत्येकी १२५ जागा हे दोन्ही पक्ष लढवणार असून मित्रपक्षांना ३८ जागा देण्यात येणार आहेत असे शरद पवारांनी सांगितले. याशिवाय भाजपचे कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी बिहार, उत्तरप्रदेश, तेलंगणा, केरळ, आसाम, मध्यप्रदेश, पंजाब, राजस्थान, सिक्कीम इत्यादी राज्यांतील भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत महाराष्ट्रातील एकूण ३२ उमेदवारांची नावे आहेत.

इतर पक्षांच्या उमेदवारांच्या याद्या देखील लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. तसेच भाजप-सेना युतीचे कोडेदेखील लवकरच सुटणार असल्याची चिन्ह दिसत आहेत.