Home महाराष्ट्र वादग्रस्त विधान केल्याने शेवटी वारीस पठाण यांच्या वर पोलिसां कडून गुन्हा दाखल

वादग्रस्त विधान केल्याने शेवटी वारीस पठाण यांच्या वर पोलिसां कडून गुन्हा दाखल

0
Waris Pathan

प्राईम नेटवर्क : एआयएमआयएम चे प्रवक्ते, माजी आमदार वारीस पठाण यांनी केलेल्या वादग्रस्त विधाना प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. कर्नाटकात कलबुर्गी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवलाय.

एआयएमआयएम अध्यक्ष आणि पक्षाचे सर्वेसर्वा खासदार यासुद्दीन ओवेसी यांनी सुद्धा वारीस पठाण यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई केली होती. याप्रकरणी पक्षा तर्फे प्रसार माध्यमांशी बोलण्यावर त्यांच्यावर बंदी घातली होती.

कर्नाटकात झालेल्या एका सभे दरम्यान, “आपण १५ कोटी आहोत, पण ते १०० कोटी आहेत, पण लक्षात ठेवा, आमचे १५ कोटी १०० कोटींना भारी पडतील. लक्षात असू द्या.” असं दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करणारं, वादग्रस्त विधान वारीस पठाण यांनी केलं होतं. पक्षांतर्गत सार्वजनिक ठिकाणी बोण्यावर त्यांच्यावर बंदी घातल्याने ते याबद्दल बोलू शकणार नाहीत.

सीएए, आणि एनआरसी विरोधात सध्या देशभरात आंदोलने सुरु आहेत. वारीस पठाण यांनी गुलबर्ग्यात बोलताना, म्हटलं होतं कि, आपल्याला” स्वातंत्र्य हवं आहे, ते मागून मिळत नसतं, ते हिसकावून घ्यायचं असतं. आता फक्त आमच्या वाघिणी (म्हणजे मुस्लिम महिला) पुढे आल्या आहेत, जर आम्ही सुद्धा पुढे आलो तर, तुम्हाला घाम फुटल्या शिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा आपण १५ कोटी आहोत, पण ते १०० कोटी आहेत, पण लक्षात ठेवा, आमचे १५ कोटी १०० कोटींना भारी पडतील.”

दरम्यान कर्नाटकात पुन्हा एकदा यासुद्दीन ओवेसी यांच्या मंचावरून एका तरुणीने माईक हातात घेऊन पाकिस्तान जिंदाबाद च्या घोषणा दिल्या होत्या. या मुळे ओवेसी पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. या मुलीला कर्नाटक पोलिसांनी देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक केली आहे.