Home आरोग्य महाराष्ट्रातील कोरोनाचे हॉटस्पॉट आता १४ वरून ५ वर, सगळ्यांसाठी आनंदाची बातमी

महाराष्ट्रातील कोरोनाचे हॉटस्पॉट आता १४ वरून ५ वर, सगळ्यांसाठी आनंदाची बातमी

0

महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची रुग्णसंख्या दिवसागणिक वाढतचं होती. मात्र आता राज्यातला डबलिंग रेट हा सध्या सात दिवसांवर आहे. सध्या आपण समाधानकारक प्रगती करतो आहे. महाराष्ट्रात १४ हॉटस्पॉट होते ते आता पाच वर आले आहेत हे चित्र अतिशय दिलासादायक आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

राजेश टोपे यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून आज जनतेशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले कि, राज्यात १४ हॉटस्पॉट होते ते आता पाच वर आले आहेत. औरंगाबाद, सांगली, अहमदनगर हे हॉटस्पॉट होते. मात्र आता ते हॉटस्पॉट नाहीत. मालेगाववर जास्त फोकस केला असता तर हॉटस्पॉट हे चारच राहिले असते, असेही त्यांनी म्हटले आहे. तसेच रुग्ण बरे होण्याची संख्या ही चांगली आहे, असेही टोपे यांनी स्पष्ट केले.

आधी तीन दिवसामध्ये रुग्ण संख्या दोन अंकी व्हायची ती आता सात दिवसांवर गेलेली आहे. मृत्यूदर नियंत्रणात आणण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. महाराष्ट्रासाठी विशेष टास्क फोर्स नेमण्यात आली आहे. एकही मृत्यू होऊ नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. जे मृत्यू झाले झालेत त्यापैकी बहुतांश रुग्णांना इतर आजारांचा इतिहास होता, असेही टोपे यांनी सांगितले आहेत.

संस्थात्मक क्वारंटाइन मात्र आपण वाढवतो आहोत. समजा रुग्णांची संख्या वाढली तर आपली तयारी असावी तरीही आपण सगळी तयारी करतो आहोत. धारावीत होम क्वारंटाइन शक्य नाही. त्यामुळे ज्यांना करोनाची लक्षणं दिसत असतील तर समोर या, असे आवाहन राजेश टोपे यांनी पुन्हा एकदा केले.