Home आरोग्य “पुढील २१ दिवसात कोरोना संपेल असे अजिबात नाही, सर्व संकटांना तोंड देण्याची...

“पुढील २१ दिवसात कोरोना संपेल असे अजिबात नाही, सर्व संकटांना तोंड देण्याची तयारी ठेवा”: छगन भुजबळ

0


कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने निर्णय घेत २१ दिवसांचे लॉकडाउन अंमलात आणले. पण ह्या येत्या ३ आठवड्यात ही कोरोणाची परिस्थिती निवळलेली असेल असे अजिबात नाही आणि त्यापुढची तयारी सुद्धा आपल्याला ठेवावी लागेल असे मत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.

एका मराठी दूरसंचार वाहिनीवरील मुलाखतीदरम्यान उत्तरे देतांंना त्यांनी हे स्पष्ट केले तसेच, ” तुम्ही किती अन्नधान्य विकत घेऊन ठेवणार आहात असा प्रश्न सुद्धा त्यांनी जनतेला विचारला. “तुम्ही अन्नधान्याची चिंता करू नका सरकार त्याच्या पुरवठ्यासाठी पूर्ण उपाययोजना करत आहे” असे सुद्धा ते म्हणाले व येत्या काळातील अन्न पुरवठ्याबद्दल त्यांनी सर्वाना आश्वस्त केले.

“महाराष्ट्र राज्याला पुढील ६ ते ७ महिने पुरेल इतका अन्न साठा सध्या शिल्लक आहे आणि कुठलाच तुटवडा राज्यामध्ये नाही. त्यामुळे नागरिकांना घाबरून जाण्याचा अजिबात प्रश्न नाही. मोदींजींच्या भाषणानंतर लोकांनी एकचं गर्दी केली असे कृपया करू नये, शिधा पुरवठा करणाऱ्या घटकांची एक प्रणाली आहे आणि ती एका दिवसात सर्व काही पुरवठा करू शकत नाही त्यामुळे कोणीही घाबरून न जाता अन्नधान्याची चिंता करू नये तर पुढच्या काळासाठी सर्वांनी मनस्तिथी पक्की करावी” असे छगन भुजबळ म्हणाले.